
पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा किंवा मोदींच पंतप्रधान होतील, हे जाहीर करावं, – मंत्री उदय सामंत
पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा किंवा मोदींच पंतप्रधान होतील, हे जाहीर करावं असे आव्हान मंत्री उदय सामंत याने इंडिया आघाडीला दिले आहे
इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या बैठकीवरुन आघाडीवर टीका केलीये. आम्ही गुवाहाटीला गेलो, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो म्हणून टीका करण्यात आली. पण, आता मुंबईतील बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च होत आहे, त्याचं काय? असा सवाल सामंत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
३१ आणि १ तारखेला असंतृष्ट लोकांचा मेळावा भरतोय त्याला इंडिया असं नाव देण्यात आलंय. स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या नावाचा उपयोग केला जातोय.२ दिवसांची ही बैठक नाही. यात विविध कार्यक्रम आहेत. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो, यावरुन टीका केली. आता यांची व्यवस्था बघा. ५४ हजारांच्या नव्या खुर्चा, ६५ खोल्या बुक केल्या, जेवणाची व्यवस्था बघा. १४ तासांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाय, असं ते म्हणाले.मुंबईत लोकांना रोजगार दिला त्यासाठी धन्यवाद, असा टोमणा त्यांनी लगावला. पण निवडणुकीनंतर हे असं काहीच राहणार नाही, कारण नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील.राम मंदिर, कारसेवक, समान नागरी कायदा अशा अनेक विषयांवर जे बाळासाहेबांची मतं होती, त्यांना या लोकांनी विरोध केला होता, असं ते म्हणाले.
केवळ ५ पक्ष सोडले तर ११ पक्षांचे खासदार शून्य आहेत. NDA मध्ये ३६५ खासदार आहेत. देशाच नाव मोठं करणाऱ्या नेत्याचं खच्चीकरण केल जातंय. ही लोकं मुंबईत केवळ पर्यटनासाठी आलेत. मुंबईत बैठकीला आलेल्या लोकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा किंवा मोदींच पंतप्रधान होतील, हे जाहीर करावं, असं ते म्हणाले.
www.konkantoday.com