
रत्नागिरी तालुक्यात खारवी समाज भगिनीनी पारंपरिक पद्धतीच्या वेशभुषा करुन समुद्राची केली पूजा
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड तसेच गावडेआंबेरे येथे खारवी समाजभगिनीनी पारंपरिक पद्धतीच्या वेशभुषा करुन समुद्राची पूजा केली आणि समुद्राला शांत होण्याचे आवाहन करतानाच मासेमारी व्यवसायात बरकत देण्याची प्रार्थनाही केली.रत्नागिरी जवळच्या पुर्णगड येथे नारळी पोर्णिमेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. त्यानिमित्त नारळाची मोठ्या आकाराची प्रतिकृती तयार करुन त्याची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वेशभुषा करुन कोळी बांधवांनी समुद्रात नारळ सोडून समुद्राला शांत होण्याची विनंती केली. पूर्णगडप्रमाणेच गावडे आंबेरे येथेही ढोलताशांच्या गजरात नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली.
www.konkantoday.com