लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ९ प्रदूषणग्रस्त गावाअंतर्गत १३ विकासकामांसाठी १ कोटी ८४ लाख


लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ९ प्रदूषणग्रस्त गावाअंतर्गत १३ विकासकामांसाठी १ कोटी ८४ लाख २२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करत निविदा काढून लवकरात लवकर कामे सुरू करण्याच्या सूचनाही शिवसेना नेते रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अनेक वर्षापासून लोटे गावातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या प्रस्तावांची यादी तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्या माध्यमातून युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन काते व लोटे शिवसेना शाखाप्रमुख शैलेश चाळके यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे दिली होती. याबाबत सामंत यांनी मंजुरी केलेले पत्र जोडण्यात आले आहे. तसेच अंदाजपत्रक तयार करून निविदा काढून लवकरात लवकर कामे सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button