
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सर्व पक्षिय ‘सहकार पॅनल’ चे वर्चस्व
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सर्व पक्षिय ‘सहकार पॅनल’ ने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले आहे.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बाजार समितीसाठी सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र, तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक घ्यावी लागली. सहकार पॅनलचे हेमचंद्र माने (भाजप), गजानन पाटील (शिंदे सेना), सुरेश कांबळे (राष्ट्रवादी) हे तीन संचालक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
११ जागांसाठी झालेल्या निवडणूक निकालात अरविंद आंब्रे (राष्ट्रवादी) विजय टाकळे (राष्ट्रवादी), मधुकर दळवी (शिंदे सेना), नैनेश नारकर (ठाकरे सेना) रोहित मयेकर (शिंदे सेना), सुरेश सावंत (राष्ट्रवादी), संदीप सुर्वे (ठाकरे सेना), स्मिती दळवी (राष्ट्रवादी), स्नेहर बाईत (ठाकरे सेना), ओंकार कोलगे (शिंदे सेना), प्रशांत शिंदे (ठाकरे सेना) उमेदवार विजयी झाले आहेत.
www.konkantoday.com
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणातील कठीण असलेले कातळ फुटता फुटत नसल्याने कंत्राटदार हैराण
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणातील कठीण असलेले कातळ फुटता फुटत नसल्याने कंत्राटदार हैराण झाला आहे
मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामाची लगीनघाई सुरू झाली आहे. मात्र, घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.कातळ फोडण्याचे काम चाेवीस तास ब्रेकरच्या सहाय्याने सुरू आहे. परंतु, अतिशय कठीण असलेले हे कातळ फुटता फुटत नसल्याने तेथे तात्पुरत्या स्थितीत बायपास तयार करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे.
गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे रखडले होते. सध्या घाटात दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. याठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला आहे.
www.konkantoday.com