
सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बसलेल्या दोघांवर कारवाई
रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील एका पडक्या गाळ्याजवळ दारू पिण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 20 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. करण्यात आली. रफत करीम फणसोपकर (22), ताहीर रफिक कोतवडेकर (22, दोन्ही रा. राजीवडा, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी शहर पोलीस आठवडा बाजार येथे गस्त घालत होते. तेव्हा येथील नगर परिषदेच्या इमारतीच्या मागील बाजूला पडक्या गाळ्याजवळ हे दोघेही दारूची बाटली घेऊन पिण्यासाठी बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.