
खोपी येथे बसची दुचाकीला धडक, चालकावर गुन्हा दाखल
खेड : दुचाकी व बसची समोरासमोर धडक खोपी मार्गावर दि.16 रोजी सकाळी 8 वाजता झाली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार दि. 16 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सूर्यकांत चंद्रकांत भोसले (26, रा.शिरगाव देऊळवाडी ता. खेड ) व त्यांचे काका यशवंत कृष्णा भोसले (रा. शिरगाव देउळवाडी, ता. खेड) हे दुचाकी (एमएच 08 एएस 1421) वरून कुळवंडी शिवाजीनगर मार्गे लोटे एमआयडीसीकडे जात होते. खोपी तांबडवाडी जवळ एका वळणावर समोरुन आलेल्या बसची ( एमएच 20 बी एल 3301) त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवर स्वार दोघांनाही दुखापत झाली. दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी खेड पोलिसांनी बसचालक प्रवेश ज्ञानबा भगव (43, रा. एसटी डेपो खेड, ता.खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.