
ओणी येथील वात्सल्य मंदिरला शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार प्रदान
सावर्डे : ओणी येथील वात्सल्य मंदिर या संस्थेला या वर्षीचा शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सावर्डे येथील स्व. गोविंदराव निकम स्मृतीगंध येथे या जयंती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावर्डे सरपंच समिक्षा बागवे, पारनेरचे आमदार नीलेश लंके, उद्योजक व लेखक शरद तांदळे, ज्येष्ठ सिने कलाकार मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते संजय मोने, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, आ. शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, सचिव महेश महाडिक, डॉ. महेंद्र मोहन, सहायक पोलिस आयुक्त मुंबई उदय राजेशिर्के, प्रमोद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व. गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार प्रदान सोहळा झाला. रोख 25 हजार रूपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचा आ. निकम यांनी सत्कार केला.