
रिफायनरी प्रकल्प उभारणीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी आता दंड थोपटले,थेट सड्यावर (कातळावर) तंबू उभारले
बारसू-सोलगाव-गोवळ परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी आता दंड थोपटले आहेत.त्यासाठी आक्रमक पवित्रा घेताना प्रस्तावित प्रकल्प परिसरामध्ये सर्वेक्षणासह अन्य होणाऱ्या कामाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी थेट सड्यावर (कातळावर) तंबू उभारले आहेत. या तंबूमध्ये राहून थेट रिफायनरी उभारणीला आव्हान देण्याचा निर्धार प्रकल्पविरोधकांनी केल्याची माहिती बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी दिली.
या परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या जोरदार हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. त्याला स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जात आहे. मात्र, तरीही या परिसरामध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाची भूमिका अनुकूल असल्याचे चित्र आहे.
अशा स्थितीमध्ये प्रकल्पाविरोधात आता आरपारची अन् निकराची लढाई लढण्याचा निर्धार प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी केला आहे.
www.konkantoday.com