
मांडवी किनार्यावर आढळला अज्ञाताचा मृतदेह
रत्नागिरी: शहरातील मांडवी समुद्रकिनारी मंगळवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा.सुमारास अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणार्या नागरिकांना एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. याबाबत त्यांनी शहर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.