
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.बहुतांशी रस्ते हे खड्डेमय झाले असल्याने वाहने चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बारा किलोमीटरच्या वसल्ल्या औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते कमालीचे उखडले असून या परिसरात प्रवास करताना वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच येथील रस्ते उखडलेले होते. खरतर पाऊस सुरु होण्याआधीच संबंधित यंत्रणेने रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पाऊस सुरु झाल्यावर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भर पडली असून खड्डे रस्त्यात कि रास्ता खड्ड्यात असे म्हणायची वेळ आली आहे.
www.konkantoday.com