
रत्नागिरीकरांची कृत्रिम तलावातील गणपती विसर्जनाला पसंती; दोन टन निर्माल्यापासून खतनिर्मिती
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाला नागरिकांनी यंदाही प्रतिसाद दिला. सुमारे 50 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले.
नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने सुमारे दीड ते दोन टन निर्माल्य संकलन केले. संकलित केलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. निर्माल्य कलशासह आरोग्य विभागाची वाहनेही निर्माल्य जमा करत होते. माळनाका, स्वा. लक्ष्मीचौक, जयस्तंभ येथील उद्यान, आठवडा बाजार येथील मैदानात कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तसेच मांडवी समुद्रकिनारी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते.