
पुढच्या वर्षी लवकर या…कोकणात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
रत्नागिरी : दीड दिवसांच्या बाप्पांना गुरुवारी निरोप देण्यात आला. यावेळी समुद्रकिनार्यावर गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. जिल्ह्यात जवळपास बाराहजार गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरी शहरानजीकच्या मांडवी, पांढरा समुद्र, भाट्ये किनारी अनेक भक्तगण गणरायाला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. गुरुवारी वाद्यांच्या गजरात गणरायांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रार्थना गणरायाला करण्यात आली.