
संतोष केतकर यांच्या अॅनाॅमॉर्फी या रांगोळी प्रकाराने नाशिककराना जिंकले
चिपळूण- येथील सुप्रसिद्ध रांगोळीकार संतोष केतकर यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या आंतरराज्य रांगोळी प्रदर्शनात सहभाग घेऊन अॅनाॅमॉर्फी या रांगोळी प्रकारच्या माध्यमातून मोठे यश संपादन केले आहे.
अॅनाॅमॉर्फी या रांगोळी प्रकारात विशिष्ठ आकारात रांगोळी काढली जाते. रांगोळीच्या मध्यभागी रिफ्लेक्टर म्हणून पाइप उभा ठेवला जातो. या रिफ्लेक्टर वर रांगोळीची प्रतिमा उमटते. प्रत्यक्षात काढलेली रांगोळी पाहून चित्र ओळखणे कठीण असते परंतु रांगोळीची प्रतिमा पाईप वर प्रतिबिंबीत झाल्यावर रांगोळीचे अपेक्षित चित्र प्रेक्षकांना दिसते. भौतिकशास्त्र,भूमिती आणि कला या तीन्हीचा संगम असलेली ही कला संतोष केतकर यांनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केली आहे.या रांगोळी प्रकारात त्याच्या जितके जवळ जावे तेवढी मोठी होणारी प्रतिमा अशी जादुई किमया असते. संतोष ने मी प्रयत्नपूर्वक आत्मसात केली आहे.
संतोष केतकर यांनी अॅनाॅमॉर्फी या चित्र प्रकाराने. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अॅनाॅमॉर्फी अर्थात प्रतिबिंब चित्र रेखाटले होते.सावरकर ज्ञानी आणि विज्ञाननिष्ठ असल्याने त्यां रांगोळी ला त्वंज्ञानमयोविज्ञानमयोऽसि अशी साजेशी स्लोगन रांगोळीला दिली होती.
संतोष केतकर यांनी इंटरनेट,संदर्भ ग्रंथ वाचून या कलेचा अभ्यास केला आहे. यापूर्वीही त्यांनी या प्रकारात सात आठ रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
याबाबत संतोष केतकर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की ही सातव्या शतकात उदयास आलेली ही कला आहे. अॅनाॅमॉर्फी पद्धतीने Perspective अॅनाॅमॉर्फी, Conical अॅनाॅमॉर्फी, Cylindrical अॅनाॅमॉर्फी असे 3 प्रकारे आहेत.या तीनही प्रकारात मी काम करू शकतो.
भारतात अशी रांगोळी रेखाटन करणारे फक्त 25 कलाकार आहेत. त्यामध्ये चिपळूण मधील संतोष केतकर एक आहेत. नाशिकच्या या रांगोळी संमेलनात राजस्थान, गुजराथ,कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आधी राज्यातून मोठ्या प्रमाणावर रांगोळी चित्रकार सहभागी झाले होते. या सर्वांमध्ये चिपळूणच्या संतोष केतकर यांनी आपल्या अॅनाॅमॉर्फी या अद्भुत रांगोळी प्रकाराने विशेष यश संपादन केले. त्यामुळे रसिकांचे आणि माध्यमांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
संतोष केतकर चतुरंग, रंगकर्मी आणि संस्कार भारती सारख्या कलेसाठी काम करणाऱ्या संस्थेत नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.