
लांजाच्या उपनगराध्यक्षपदी पूर्वा मुळे बिनविरोध
लांजा : नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिवसेनेच्या पूर्वा मुळे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेकडून या पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने या निवडीवरून वाद निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कोणतेही वाद न होता ही निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकांना सव्वा वर्षाचा कालखंड आखून देण्यात आला आहे. त्यानुसार सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर अनेक जण इच्छुक असल्याने लांजाचा नवीन उपनगराध्यक्ष कोण होणार, याबाबत शहरात अनेक चर्चांना पेव फुटले होते. गुरुवारी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत तसेच नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वा मुळे यांची निवड करण्यात आली.
गेल्या एक महिन्याच्यापासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्य आणि पक्षप्रमुखांनी दिलेल्या वाढत्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर आ. राजन साळवी यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण जोमाने खांद्यावर पेलले आहे. घडलेल्या राजकीय उलथापालथीचा राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लांजातील शिवसेनेवर कोणताही परिणाम झालेला नसून आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली लांजा न. पं. मधील शिवसेनेचा एकही नगरसेवक फुटलेला नाही. त्याचीच प्रचिती म्हणून पूर्वा मुळे यांची लांजाचा उपनगराध्यक्षपदी सर्वांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात झाली.
दरम्यान, उपनगराध्यक्ष निवडताना लांजा न.पं.चे एकदिवसीय प्रभारी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, प्रशासकीय अधिकारी अविराज पाटील, शिवेसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, संपर्कप्रमुख जगदीश जुलूम, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, राहुल शिंदे, मंगेश मुळे, प्रसाद भाईशेट्ये, नगरसेवक नंदराज कुरूप, स्वरुप गुरव, लहू कांबळे, रफिक नेवरेकर, सचिन डोंगरकर तसेच नगरसेविका यामिनी जोईल, वंदना काटगाळकर, मधुरा बापेरकर, मधुरा लांजेकर, सोनाली गुरव व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.