
वडद येथे वादळी पावसाने घराचे नुकसान
गुहागर : तालुक्याला वादळी व मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.वादळी पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेले काही दिवस पावसाने संततधार सुरू ठेवली असून वादळी वार्यामुळे वडद सुतारवाडी येथील सिताराम पिंपळकर यांच्या घराची पडवी कोसळल्याने त्यांचे सुमारे 8 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा पंचनामा तलाठी बालाजी सुरवसे यांनी केला. तसेच पाभरे धनगरवाडी येथे शंकर बाबाजी गोरे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संततधार कायम असून शुक्रवारी 128 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.