
जिल्ह्यातील 30 धरणे ओव्हरफ्लो
रत्नागिरी : पावसाने जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 45 टक्के सरासरी गाठली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 30 हून अधिक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोकणात पाऊस सक्रीय झाला. सुरवातीला पाऊस पडला नाही. यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. म मात्र आता परेण्या जवळपास उरकलेल्या आहेत. संगमेश्वरातील गडनदी, खेड तालुक्यातील नातूवाडी, राजापूर तालुक्यातल्या पूर्व भागातील अर्जुना धरण, लांजा तालुक्यातील खोरनिनको धरणासह सर्वच धरणे भरली आहेत. यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.