
निवडणुकांमध्ये मनसे ताकदीने उतरणार : मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव
रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे मनसेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहून मतदार संपर्क सुरू करावा, असे आवाहन मनसेचे नूतन तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी या प्रवेश सोहळ्यावेळी केले. शहरातील जयस्तंभ येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पावस येथील तरुणांनी मनसेत प्रवेश केला. तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर रूपेश जाधव यांनी पक्षसंघटन वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, जिल्हा सहसंपर्क अध्यक्ष मनिष पाथरे, कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस सुनील साळवी, माजी जिल्हा सचिव बिपिन शिंदे आदी उपस्थित होते.