
निराधार योजनेसाठी दरवर्षी उत्पन्नाचा दाखला कशासाठी? शौकत मुकादम यांचा सवाल
चिपळूण : महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ राष्ट्रीय सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे. निराधाराला आधार मिळावा म्हणून शासनाने या योजना सुरू केलेल्या आहेत. परंतु तहसीलदार कार्यालयातून प्रत्येक वर्षी या योजनेच्या लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. मात्र, याची गरज काय? असा प्रश्न माजी सभापती, राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी उपस्थित केला
आहे.
ज्या निराधार व्यक्ती आहेत त्यांना शासनाकडून आधार मिळावा म्हणून पेन्शन योजना सुरू आहे. यात निराधार वयोवृद्ध जो कुठलाही व्यवसाय करू शकत नाही, म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे. चिपळूण तालुक्यामध्ये सुमारे 5 हजार लोक या योजनेचा लाभ
घेतात.
संबंधित लोकांकडून प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला मागणे हे चुकीचे आहे. पेन्शन व्यतिरिक्त निराधाराला कुठलाही उत्पन्न नसते तरी उत्पन्नाचा दाखला मागणे बंद करावे, अशी मागणी माजी मुकादम यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली
आहे.