
जागतिक सायकल दिनानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन
जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या माध्यमातून प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा.एम.क्यू.एस.एम. शेख साहेब तसेच दिवाणी न्यायाधीश माननीय चौत्रे साहेब यांच्या विनंतीवरून व जिल्ह्या न्यायालयाच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन केले गेले होते.
मारुती मंदिर-जयस्तंभ-भाट्ये-झारीविनायक-गोळप धार ते जिल्हा न्यायालय असा जवळपास 25 किलोमीटरचा या सायकल रॅलीचा मार्ग होता.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या या रॅलीमध्ये फोटोग्राफर,ज्वेलर,हॉटेल मालक ,गायक,ट्रेकर,बँकर, ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी,वकील,आयटी प्रोफेशनल, सरकारी कर्मचारी ,दुकानदार,व्यापारी अशा विविध क्षेत्रातले बहुसंख्य सायकलप्रेमी सहभागी झाले होते.
हायब्रीड,एमटीबी,रोडी अशा विविध प्रकारच्या सायकल्स हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या मेम्बर नी नवीन सायकलप्रेमींना त्यांच्या बरोबरीने सायकल चालवून प्रोत्साहित केले.
पुढच्या वर्षभरात 1 लाख किलोमीटर सायकलिंग च उद्दिष्ट ठेवलेल्या क्लब ची आपल्या ध्येयाकडे जोरदार वाटचाल सुरु असल्याचे यावेळी क्लब मेम्बर कडून सांगण्यात आले .
जिल्हा सत्र न्यायालयामार्फत सर्व सायकलप्रेमींची चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती.या रॅलीच्या यशस्वीतेसाठी दर्शन जाधव,धीरज पाटकर,महेश सावंत,निलेश शहा ,योगेश मोरे ,तृणाल येरुणकर,विनायक पावासकर,प्रसाद देवस्थळी,मंगेश शिंदे ,यतीन धुरत,शेखर लाखण,
मुग्धा भट-सामंत,श्रद्धा रहाटे,हर्षदा कुलकर्णी तसेच जिल्हा न्यायालय वरिष्ठ लिपिक श्रीमती वर्षा ठाकूरदेसाई आणि सर्व जिल्हा न्यायालय कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.