
शिरगाव मत्स्य अभियांत्रिकी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी पदविका शिरगाव येथे 26 आणि 27 मे रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
दीपप्रज्ज्वलन आणि स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मंगेश शिरधनकर यांच्या उपस्थितीत पार पडले.विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. पाहुण्यांची ओळख तौसिफ काझी यांनी करून दिली. वार्षिक अहवाल वाचन सुजय पटेकर यांनी केले.
विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयाच्या पहिल्या ‘अंकुर’ या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात कलाविष्कार सादर केला. एकांकिका, गायन, नाटक, सोलो डान्स, ग्रुप डान्स, इतर विविध कलागुण सादर
केले.
आभार विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राकेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मंगेश शिरधनकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित
होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणाचे कौतुक केले.