
रत्नागिरीतील डी-मार्टसमोर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार गंभीर
रत्नागिरी : मालवण वरून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसचा आणि दुचाकीचा शहरानजिकच्या डी-मार्ट समोर भीषण अपघात झाला. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. एसटी आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील स्वार विथलेश विनायक फगरे (वय २२) हा गंभीर झाला. 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.





