
नॅकमध्ये मिळालेलं यश हे सर्वांच्या मेहनतीचं फळ- कुलगुरू
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांची रत्नागिरी उप-परिसर ला सदिच्छा भेट
रत्नागिरी- मुंबई विद्यापीठाला नॅकमध्ये मिळालेलं यश हे सर्वांच्या मेहनतीचं फळ असल्याचं प्रतिपादन कुलगुरू प्रा सुहास पेडणेकर यांनी केलं..165 वर्षांचं असलेले हे मुंबई विद्यापीठ किती गौरवशाली आहे आणि याच विद्यापीठात काम करण्याची संधी आपल्या सारख्या कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे हे आपलं भाग्य आहे असेही यावेळी कुलगुरू प्रा सुहास पेडणेकर म्हणले…त्यानंतर नॅकमध्ये(NAAC) मुंबई विद्यापीठाला A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाली यासाठी योगदान दिल्याबद्द्ल मा. कुलगुरू यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाचे मानचिन्ह देऊन प्राध्यापक व कर्मचारी यांना गौरवण्यात आलं…यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधिर पुराणिक, अधिष्ठाता कॉमर्स अँड मॅनेजमेंट डॉ. अजय भामरे, संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉ.सुनील पाटील व अभियंता विनोद पाटील उपस्थित होते..
कुलगुरू यांनी उप- परिसर रत्नागिरी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी उपपरिसराच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला . त्यानंतर नॅकमध्ये(NAAC) मुंबई विद्यापीठाला A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाली यासाठी योगदान दिल्याबद्द्ल मा. कुलगुरू यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाचे मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी रत्नागिरी उप परिसराचे प्रभारी संचालक डॉ श्रीकिशोर सुखटणकर, कुलसचिव अभिनदांन बोरगावे यांच्यासह प्राध्यापक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते…