
मुलीची बदनामी केल्याच्या गैरसमजातून बोटमालकाच्या डोक्यात लोखंडी सळी मारून जखमी करणार्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल
तुझ्या मुलीने आत्महत्या का केली असे विचारल्याच्या रागातून बोटमालकाच्या डोक्यात लोखंडी सळी मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे तसेच तो उपचार घेत असताना त्याला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बाप-लेकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समीर नुरुद्दीन सोलकर, सैफुल्ला समीर सोलकर, साहिल समीर सोलकर (सर्व रा. कोकणनगर, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जैनुद्दीन अहमद सुवर्णदुर्गकर (65,रा.राजीवडा, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,समीर सोलकर हा सुवर्णदुर्गकर यांच्या बोटीवर तांडेल म्हणून कामाला होता. आठ दिवसांपूर्वी त्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे समीर सोलकर बोटीवर कामासाठी येत नव्हता.22 एप्रिल रोजी तो सुवर्णदुर्गकर यांच्या घरी गेला असता तूझ्या मुलीने गळफास का घेतला. ती गरोदर असल्याची अफवा गावात सुरु आहे, असे विचारले.
तेव्हा समिरने ती एकटीच राहायची आणि असे काहीही झालेले नसल्याचे सांगितले. दरम्यान,26 एप्रिल रोजी समीरने सुवर्णदुर्गकर यांच्या घरासमोर जाऊन माझ्या मुलीची बदनामी करतोस असे म्हणून शिवीगाळ करत लोखंडी सळी त्यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर ते जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. तेव्हा समीर आणि त्याचे दोन मुलगे सैफुल्ला व साहिल या तिघांनी तेथे जाऊन तू अपघात विभागाच्या बाहेर ये तुझा मर्डर करतो अशी धमकी दिली.अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार राठोड करत आहेत.
www.konkantoday.com