
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी येणार खरवतेत
चिपळूण : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी दि. 24 रोजी चिपळूण तालुक्यातील खरवते-दहिवली येथे येणार आहेत. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शरदचंद्रजी पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आवारात येथील माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल तसेच महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2.30 वा. हा सोहळा होणार आहे.