
आयुष विभाग बंद नाही, जिल्हा शल्यचिकित्सकांचा खुलासा
रत्नागिरी दि. २१ : जिल्हा शासकिय रुग्णालयातील आयुष विभागामध्ये औषधांकरिता निधी उपलब्ध
असतानाही औषधाविना आयुष विभाग बंद ठेवलेबाबत खोटया व निरर्थक बातम्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून प्रसिध्द झाले आहे.
रुग्णालयातील आयुष विभागामार्फत रुग्णांना आयुषचे आयुर्वेदिक रुग्ण सेवा नियमित चालु असून बंद करण्यात आलेले नाही. आयुष औषधांकरिता रु.३० लक्ष अनुदान मिळालेले नसून, औषधाविना आयुष विभाग बंद आहे ही बातमी खोटी आहे. स्थानिक स्तरावर आयुर्वेदिक औषधांची खरेदी करुन औषधे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. होमिओपेथिक औषधांच्या खरेदी करीता जाहिर सुचना प्रसिध्द करुन सुध्दा पुरवठादार उपलब्ध झालेले नाहीत. व त्याची प्रक्रिया चालु आहे.
तरी, सदर बातमी खोटी असून जनमानसामध्ये जिल्हा रुग्णालय व आयुष विभागाची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने देण्यात आल्याचे दिसून येते. जिल्हा रुग्णालय प्रशासनामार्फत सदर बातमीचे खंडन करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com




