
काळबादेवीत धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी साडेसात कोटी : ना. सामंत
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी गावाला गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात तुफानी लाटांचा सामना करावा लागत आहे. या किनार्याची मोठी धूप होत आहे. येथील नागरिकांच्या मागणीनुसार याठिकाणी एक किलोमीटरचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी
दिली. या ठिकाणी पावसाळ्यात मोठे नुकसान होते. वर्षानुवर्षे निसर्गाच्या संकटाचा सामना येथील नागरिक करत आहेत. यावर तोडगा निघणार असून ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.