पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट रत्नागिरीकरांचा, अ व्हॅलेंटाईन्स डे, जगभरातील विविध भाषांमध्ये होणार प्रदर्शित

मर्चंट नेव्हीमध्ये गेली २२ वर्षे कॅप्टन असलेला रत्नागिरीचा सुपुत्र फैरोज अनवर मजगावकर चित्रपटाद्वारे मराठीचा झेंडा सातासमुद्रापार रोवण्यास सज्ज झाला आहे. त्यांची पहिली निर्मिती असलेला अ व्हॅलेंटाईन्स डे हा मराठी चित्रपट मराठीसह इंग्रजी, स्पॅनिश अशा विविध भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे, असा बहुमान मिळणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.
रत्नागिरी जिल्हा फूटबॉल असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा सुपरसेव्हन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांना गायन, मॉडेलिंगचा छंद आहे. महाविद्यालात असताना अभिनयाची आवड होती, मात्र तत्कालीन परिस्थितीमुळे त्यांना पूर्णवेळ अभिनयाकडे वळता आले नाही, अ व्हॅलेंटाईन्स डे या आपल्या पहिल्या चित्रपट निर्मितीमध्ये ते आणि त्यांचा मुलगा अदीन माजगावकर महत्वपूर्ण व्यक्तीरेखा साकारणार आहे.
माझी गोल्डन स्ट्राईप्स एन्टरटेंमेंट कंपनी आणि कियान फिल्मस अँड एन्टरटेन्मेंट हे चित्रपटाचे निर्माते ओत. तर सहयोगी निर्माते अनन्या फिल्मस आहेत. लेखक, दिग्दर्शक अजित दिलीप पाटील आणि कार्यकारी निर्माते सोमनाथगिरी आहेत. या चित्रपटाचे उत्कंठावर्धक टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत मराठीतील बड्या अभिनेत्याचा समावेश आहे. तसेच या चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये बॉलिवूड व इजिप्शियन फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांचा समावेश आहे. चित्रपटाचे शूटींग देशातील विविध शहरांसह कोकणात होणार असल्याचेही माजगावकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button