शिवानी नागवेकर समस्त रत्नागिरीचा अभिमान – ना. सामंत

रत्त्नागिरी-मुंबई विमानसेवा सुरू झाली की, आपल्या रत्नागिरीचा अभिमान असलेली शिवानी नागवेकर ही त्या विमानाची कॅप्टन असेल आणि पहिल्या विमानात मी आणि बाळासाहेब असणार, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. 

रत्नागिरीतील भाई विलणकर यांची नात शिवाजी नागवेकर हिने महिला वैमानिक हाेण्याचा मान मिळविला आहे. यानिमित्त तिचा माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात नागरी सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सत्कार साेहळ्याला माजी आमदार बाळ माने, माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर, उद्याेजक रवींद्र सामंत, भाऊ शेट्ये, मिलिंद कीर, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित हाेते.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, तिने किती कष्ट केले आहेत, ती कशी इथपर्यंत पाेहाेचली आहे, काेणत्या प्रसंगातून गेली आहे हे तिने सांगितले आहे; पण, प्रसंग तिनेही कुठेतरी लिहून ठेवले पाहिजेत. भविष्यात आपण काेठेही असू; पण मागे आपण किती कष्ट घेतले आहेत, हे लाेकांना कळले पाहिजे. शिवानीसारख्या विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. तुझ्यानंतर तयारी हाेणारी जी पिढी आहे, त्यांनाही कळले पाहिजे. पायलट म्हणून काम करीत असताना रत्नागिरी विमानतळाचा उल्लेख झाला. बाळासाहेबांनी सांगितले आहे की, विमानतळ येथे सुरू हाेणार; पण आज रत्नागिरीकरांच्या समाेर सांगताे की, विमानतळ सुरू करणार आणि पहिल्या विमानात शिवानी, मी आणि बाळासाहेब असणार, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, आपण जरी माेठे हाेताे, पण आपल्यातील नेतृत्वाला रत्नागिरीने जन्म दिलेला आहे. आपल्या पालकांनी, शिक्षणाने नेतृत्वाला जन्म दिलेला आहे हे जरी सांभाळलेस, तर रत्नागिरीकर तुला खांद्यावर घेऊन नाचतील, असेही सामंत म्हणाले. ज्यावेळी याठिकाणी एखादी इन्स्टीट्यूट बांधताे त्याचे नेतृत्व रत्नागिरीकर म्हणून करण्याची ताकद तुझ्या मनगटात असावी, असे सामंत म्हणाले. शिवानीमुळे विलणकर किंवा नागवेकरांचे नाव माेठे झाले नाही तर रत्नागिरीचे नाव माेठे झाले, असेही मंत्री सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button