
उदगीर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनाचे अॅड. कुवळेकर निमंत्रण
चिपळूण : उद्गीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लांजा येथील अॅड. विलास कुवळेकर यांना निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. कुवळेकर हे कोकणचे प्रतिनिधी म्हणून संमेलनात कविता सादर करणार आहेत. कुवळेकरांचे आजवर आठ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांनी वृत्तपत्रातून विविध विषयावर लेखन केले आहे. त्यांच्या काव्यसंग्रहांना बेळगाव, बुलढाणा, जळगाव, संगमनेर आदी ठिकाणच्या साहित्य संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची लांजा शाखा सुरु कण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. गेली सात वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वक्ते, कथाकार, कवी म्हणून कोकणातील अनेक साहित्यिकांना संधी प्राप्त झाली आहे. अॅड. कुवळेकर यांचे म.सा.प.चे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नामवंत कवी अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत, कथाकार प्रा. संतोष गोनाबरे यांनी अभिनंदन केले असून यापुढेही अखिल भारतीय संमेलनात कोकणला असेच प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आहेत.
www.konkantoday.com