
मारुती मंदिर येथील के.सी. जैन नगर कमानी समोर दाेन दुचाकीचा अपघात
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील के.सी. जैन नगर कमानी समोर अपघात झाला. एसटी स्टँडवरून मारूती मंदिरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने समोरच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
निखिल कांबळे (24 किर्तीनगर, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील दुचाकीने एसटी स्टॅन्डकडून मारुती मंदिरच्या दिशेने जात होता. मात्र त्याचवेळी विश्वास जिते (48) याना के. सी जैन नगर कमानी समोर मागाहून जोरदार धडक दिली. या धडकेत धडक दिलेल्या निखिलच्या डोक्याला जोरदार मार बसला. तर जिते यांच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली.
निखिल याला रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अधिक उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com
