
राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत चिपळूणची चमकदार कामगिरी
रत्नागिरी : राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा स्पर्धा मुंबईतील कामगार भवन, प्रभादेवी, येथे पार पडली. यात रत्नागिरीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सब – ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर 1,2,3, आणि 4 (महिला व पुरूष) इक्विप्ड
गटात झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील फिनिक्स महिला नगर परिषद जिम आणि एन.एस.जी. फिटनेस जिम चिपळूणमधील खेळाडूंनी यश मिळवले. महाराष्ट्रातील एकूण 400 खेळाडू सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सब- ज्युनियरमध्ये अनुष्का शिंदे हिने 57 किलो वजनी गटात 162.5 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले. ज्युनियर मध्ये सायली यादव हिने 47 किलो वजनी गटात एकूण 185 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. धनश्री महाडिक हिने 57 किलो वजनी गटात चौथा क्रमांक मिळवला. सीनिअर मध्ये प्रतिक्षा साळवी हिने 84 किलो वजनी गटात एकूण 362.5 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. मुलांमध्ये ज्युनियरमध्ये सौरभ बंडबे याने (53 किलो वजनी गट) एकूण 350 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले. शुभम महाडिक (83 किलो वजनी गट) 455 किलो वजन उचलून कास्य पदक मिळविले. यश सावंत (66), चिन्मय चव्हाण (74), सिंकोन पुहान (83), ओम मते (93) यांनीही ज्युनियर गटात चांगली कामगिरी बजावली. सीनिअर गटात राहुल सावंत (93) 557.5 किलो वजन उचलून पाचवा क्रमांक पटकावला. मास्टर गटात नंदकिशोर शिंदे यांनी 93 किलो वजनी गटात 402.5 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले. प्रशिक्षक राज नेवरेकर, तसेच मार्गदर्शक मदन भास्करे, निशिला महाडिक यांचे मार्गदर्शन व इतर सहकारी खेळाडूंचे सहकार्य या खेळाडूंना लाभले.