
अभाविप तर्फे वाळू शिल्पाच्या माध्यमातून नेताजींना मानवंदना
अभाविप रत्नागिरी द्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त रत्नागिरी मधील मांडवी समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पाद्वारे एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्या स्मृतीस मानवंदना देण्यात आली.
हे शिल्प सायंकाळपासून मांडवी समुद्र किनाऱ्यावर नागरिकांसाठी बघण्यास खुले केलं होते. हे शिल्प रत्नागिरी मधील प्रसिद्ध वाळू शिल्पकार अमित पेडणेकर यांनी काढले तर या शिल्पासाठी श्री. उल्हास लांजेकर यांनी मोलाचे सहाय्य केले. तसेच स्थानिक नगरसेवक बंटी कीर व मांडवी मधील नागरिकांनी वेळोवेळी सहकार्य केले. या वाळू शिल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी उद्घाटक अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगिकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व त्यांच्या देशभक्तीचे किस्से सांगितले, एवढे मोठे व्यक्तिमत्त्व असून देखील नेताजी Unsung Hero यांच्या गटात राहिले याची खंत ही व्यक्त केली. यावेळी रत्नागिरी मधील अभाविपचे रत्नागिरी शहर अध्यक्ष प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे, रत्नागिरी शहर मंत्री कौसर नाईक, रत्नागिरी विभाग (शासकीय रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा) संयोजक राहुल राजोरीआ, स्वयं नायर, वेदांत सागवेकर, राजस जयवंत आदी कार्यकर्ते तसेच अभाविपचे पूर्व कार्यकर्ते व रत्नागिरी मधील नागरिक उपस्थित होते.