
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आता उद्या परत सुनावणी
संतोष परब यांच्यावरील कथीत जीवघेणा हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाकडून आजही निकाल येऊ शकला नाही.या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांना उद्यापर्यंत अटकेपासून दिलासा कायम असणार आहे.हायकोर्टाचं कामकाज सध्या दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सुरु आहे. तीन वाजता कोर्टाची वेळ संपल्यानं आजचं कामकाज थांबवण्यात आलं. दरम्यान, नितेश राणेंच्या वकिलांकडून त्यांची बाजू आज मांडण्यात आली. यानंतर आता उद्या दुपारी एक वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
www.konkantoday.com