
गुहागरमधील जीवरक्षकांचा थकलेला पगार देऊन त्यांना तैनात ठेवावे : भाजपाची मागणी
गुहागर येथील समुद्रकिनार्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या जीवरक्षकांचा पगार देण्यात न आल्याने जीवरक्षकांनी काम थांबविले आहे. यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. नगरपंचायत प्रशासनाने या जीवरक्षकांचा थकलेला पगार देऊन त्यांना यापुढेही किनार्यावर तैनात ठेवावे, अशा मागणीचे निवेदन गुहागर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुहागर नगरपंचायतीला देण्यात आले. जीवरक्षकांची दखल न घेतल्यास समुद्रात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील किनार्यावर गेली 4 वर्ष नगर पंचायतीतर्फे जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक झाल्यापासून या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना गुहागर समुद्र किनारपट्टीवर घडलेली नाही. तसेच चिपळूण येथे पूर परिस्थिती उद्भवली असताना लोकांच्या मदतीसाठी नगरपंचायतीने या जीवरक्षकांना पाठवले होते.
www.konkantoday.com