
जम्मू काश्मिरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट ,वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत 2 महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू,वीसहून अधिकजण जखमी
जम्मू काश्मिरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागलं आहे. वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली आहे.जम्मूमधील कटरा इथल्या वैष्णो देवी मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 12 भाविकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेत वीसहून अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती आहे.
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com