
लोटे एमआयडीसीत वायुगळती
खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील योजना इंटेमिडीएट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टँकरमधून गॅस अनलोंडिंग करत असताना शुक्रवारी दुपारी वायुगळती झाली. टँकरमधून गॅस अनलोडींग करत असताना पाईप लिकेज होऊन गॅस गळती झाली. हा गॅस भोवतालच्या लोटे चाळकेवाडी व तलारीवाडी परिसरात पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
www.konkantoday.com