
रेल्वेतून विदेशी मद्य नेणाऱ्याला पोलिस कोठडी
रेल्वेतून विदेशी दारुची वाहतूक करणार्या संशयिताला न्यायालयाने गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. ही घटना बुधवार 29 डिसेंबर रोजी 3.50 वा.रत्नाागिरी रेल्वेस्टेशनवर गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये घडली होती.
वैभव दामोदर माने (32, रा. मानेवाडी आडवली लांजा,रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो गोवा राज्यातून विक्रीसाठी विदेशी दारु घेऊन संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून मुंबईला जात असताना रेल्वे सुरक्षा बल रत्नागिरीने ही कारवाई केली.
www.konkantoday.com




