
परदेशातून आलेल्या काही नागरिकांचा अद्यापही संपर्क नाही आरोग्य खात्याकडून शोध सुरू
ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी परदेशातून आलेल्यांवर आरोग्य विभागाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ६९५ जण परदेशातून आले असून त्यातील १ हजार ५५ जणांशी संपर्क झाला. त्यातील ५८८ जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजूनही ६४० जणांशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी तळागाळातील अधिकारी, कर्मचार्यांना दिल्या आहेत.
www.konkantoday.com