
भाऊबीजेला मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भेट म्हणून घरगुती गॅस सिलिंडर मागणार-खासदार सुप्रिया सुळे
देशात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आता भाऊबीजेला मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भेट म्हणून घरगुती गॅस सिलिंडर मागणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
www.konkantoday.com




