
जलव्यवस्थापनासाठी प्रेरणादायी कार्य करणार्या फिनोलेक्सच्या प्रकाश छाब्रिया यांचा गौरव
रत्नागिरीमध्ये नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आयाेजित करण्यात आली हाेती जिल्ह्यात शाश्वत एकसूत्रीपणा जलनियोजन व जल व्यवस्थापनासाठी प्रेरणादायी कार्य करणार्या व्यक्तींचा या निमित्ताने गौरव करण्यात आला जिल्ह्यात अनेक जल कार्य बंधारे आदर्शवत पाणीसाठ्याचे कार्य फिनोलेक्स कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे या कार्यासाठी प्रकाश छाब्रिया यांचा गौरव करण्यात आला त्यांच्यावतीने फिनोलेक्स इंडस्ट्रीज चे मॅनेजर तानाजीराव काकडे यांनी हा गौरव स्वीकारला मंत्री उदय सामंत, जलपुरुष राजेंद्रसिंह व हिरवळ प्रतिष्ठानचे प्रमुख किशोर धारिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
प्रेरणादायी काम करणाऱ्या डॉ अरविंद कुलकर्णी, डॉ उमेश मुंडले ,नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर ,सुगंधी लागवडीची प्रकल्प उभे करणारे विनायक काशिद ,लांजा कॉलेजचे प्राध्यापक राहुल मराठे ,साखरपा येथील नदी पुनरुज्जीवनाच्या मार्गदर्शन करणारे डॉ अजित गोखले
सांडपाण्याचा पुनर्वापरासाठी जनजागृती करणारे राजू भाटलेकर, तसेच लोटे गावात झर्यापासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग करणारे संकेत चाळके व विजय मोरे यांचा गौरव करण्यात आला
www.konkantoday.com