
कलाकार रुपेश जाधव यांना “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर.
रत्नागिरी तालुक्यातील मिर्या गावचे सुपुत्र आता वाटद खंडाळा येथे वास्तव्यास असलेले कलाकार रूपेश रविंद्र जाधव यांना आर्ट बिट्स फाउंडेशन, पुणे यांच्या कडून “युवा कला गौरव” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे रुपेश जाधव यांचे कला, सामाजिक क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रुपेश जाधव यांनी बळीराम परकर हायस्कूल,मालगुंड येथे विद्यालयीन शिक्षण घेतले आणि मोहिनी मुरारी महाविद्यालय चाफे येथुन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कला क्षेत्रात काम करण्याची जिद्द उराशी बाळगून स्वप्न उराशी बाळगले आणि जिद्दी ने सुरुवात केली.
रुपेश जाधव यांनी कलाकार म्हणून पदापर्ण केल्यानंतर मराठी वाहीनी वरील कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ, स्टार प्रवाह च्या सहकुटुंब सहपरिवार, जयभवानी जयशिवानी , तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकांमध्ये काम केले आहे, आता चित्रपटात भुमिका साकारत आहे.
कलाकार म्हणून काम करीत असलेली कामगिरी लक्षात घेऊन पुणे येथील आर्ट बिट्स, फाउंडेशन ने “युवा कला गौरव” “पुरस्कार जाहीर करण्यात आला,रूपेश जाधव हे कळझोंडी गावचे दिवंगत दानशुर व्यक्तीमत्व गोविंद गोजु पवार यांचे नातू आहेत त्यामुळे त्यांच्या वरसर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.