
कोर्ले-प्रभानवल्ली रस्त्याची दुरवस्था , काँग्रेसच्या वतीने डांबरीकरणाची मागणी
लांजा तालुक्यातील कोर्ले-प्रभानवल्ली -खोरनिनको या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरणासाठी विशेष निधी द्या अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बब्या हेगिष्टे यांनी बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सुमारे २३ कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी १८ कि.मी.चा रस्ता वाहतुकीसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. रस्त्यावरून लहान मोठ्या वाहनांची अहोरात्र ये-जा सुरू असते. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. दुतर्फा गटारे नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वहात आहे. www.konkantoday.com