
चिपळूण आगारातून पुणे मार्गावर दोन शयनयान सेवा सुरू
गेले काही दिवस बंद असणारी चिपळूण आगाराची एसटीची शयनयान सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पुणे मार्गावर दोन बसेस बुधवार दि. ११ पासून धावत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.
चिपळूण आगारातून दररोज चिपळूण पुणे-पिंपरी-चिंचवड ही शयनयान (स्लीपर कोच) सेवा सुरू झाली आहे. या दोन्ही बसेस चिपळूण ते कोयना, पाटण, उंब्रज, सातारा, कात्रज, स्वारगेट पुणे स्टेशन अशा धावणार आहेत.
www.konkantoday.com