
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू हाेणार
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शासनाच्या सहकार विभागामार्फत देण्यात आले आहेत. दि.३१ ऑगस्टपर्यंत मतदार याद्या अंतिम करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी अशी सूचना सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी केली आहे.
सहकार विभागाने यापूर्वी तीन वेळा जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील सर्व जिल्हा बँकांसाठी स्थगिती आदेश देण्यात आला होता
www.konkantoday.com