
महामार्ग पोलिसांनी राज्यभरात नेमणूक केलेले मृत्युंजयदूत हे जखमी प्रवाशांसाठी देवदूत ठरू लागले
रस्ते अपघातातील जखमींना झटपट उपचार मिळावे यासाठी महामार्ग पोलिसांनी राज्यभरात नेमणूक केलेले मृत्युंजयदूत हे जखमी प्रवाशांसाठी देवदूत ठरू लागले आहेत. ठिकठिकाणी तैनात असलेल्या मृत्युंजयदूतांनी गेल्या पाच महिन्यांत 435 जखमींचे जीव वाचवले असून 500 जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्याचे अमूल्य काम केले आहे.
महामार्गावरील अपघातांची गंभीर दखल घेत महामार्ग पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यभरात मृत्युंजयदूतांची नेमणूक केली. 1 मार्च ते 31 जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत पाच जिल्ह्यांत तैनात असलेल्या पाच हजार 71 मृत्युंजयदूतांनी 275 अपघातांत झटपट मदत पुरविली.
www.konkantoday.com