
“सागरिका म्युझिक”वर गायक अभिजीत नांदगावकर यांचे गीत झळकणार sagrika music abhijit nandgoankar
□ 10 ऑगस्ट रोजी होणार रिलीज
रत्नागिरी -: संगीत क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय “सागरिका म्युझिक कंपनी”तर्फे “केव्हा केव्हा वाटते…” हे एक नवं कोरं प्रेमगीत रसिकांच्या भेटीला येत आहे. गायक अभिजीत नांदगावकर यांच्या सुरांत भिजलेले हे गीत त्यांनीच लिहिले व संगीतबद्ध केले आहे. मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता “सागरिका म्युझिक मराठी”च्या युट्युब चॅनलसह इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, तसेच विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत रिलीज होत आहे. हृदयस्पर्शी अशा ह्या गीताच्या प्रोमोला रसिकांची उत्तम पसंती मिळत आहे.
हे गीत प्रसिद्ध अभिनेत्री पूनम घाडगे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. दिग्दर्शक दिनेश पवार यांनी याचे व्हिडिओ दिग्दर्शन, तर गौरव कुंभार यांनी छायाचित्रण व शुभम राऊत यांनी एडिटिंग केले आहे. गीताचे संगीत संयोजन दत्ता-धर्मेश, संगीत संयोजन समन्वयक मयुरेश माडगावकर, रेकॉर्डिंग-मिक्सिंग-मास्टरिंग केवल वाळंज यांनी केले आहे.

गीताबद्दल भावना व्यक्त करताना गायक अभिजीत नांदगावकर म्हणाले की, आज मला आभाळ ठेंगणं झालंय. 21 वर्षे उराशी बाळगून असलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. आज हे गीत संगीत क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय, सर्वोच्च म्युझिक प्लॅटफॉर्म “सागरिका म्युझिक”द्वारे रिलीज होतंय, याचा मला खूप आनंद झाला आहे. यासाठी मला गुरुदेव नांदगावकर, संजीव कबीर, शिल्पा पेडणेकर, दत्ता मेस्त्री, विजय कदम, दिनेश पवार आणि सागरिका दास यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
“सागरिका म्युझिक मराठी”च्या युट्युब चॅनलसह सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसेच Sawan, Spotify, Gaana.com, iTunes, Amazon music या प्रसिद्ध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही हे गीत रिलीज होत आहे. रसिकांनी या गीताला भरभरून प्रतिसाद द्यावा. अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करावे, कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्या, असे आवाहन गायक अभिजीत यांनी केले आहे.
