
मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाट ठरतोय कंटेनरसाठी अपघाताचे ठिकाण mumbai goa highway
मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात दोन महाकाय कंटेनर अडकून पडल्याने महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प होण्याचा प्रकार काल घडला
लांजा तालुक्यातील वेरळ घाट वाहनचालकांसाठी डेंजर झोन समजला जातो. वेरळ घाटात कंटेनर अडकण्याची चार वेळा घटना घडली आहे. दरम्यांन वेरळ घाटातील तीव्र उतारावर मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर बंद पडलेल्या अवस्थेवर उभा होता. याच दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महाकाय कंटेनरने उभ्या असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूने धडक दिली.चौपदरीकरणानंतर या भागात कंटेनरचे असे अपघात वारंवार का होतात याचा अभ्यास होणे गरजेचे आहे
www.konkantoday.com