
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ ऑगस्टला क्रांती दिनी 11 हजार पत्रे पाठवण्यात येणार
महाराष्ट्र सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ ऑगस्टला क्रांती दिनी 11 हजार पत्रे पाठवण्यात येणार आहेत. पत्रे पाठवण्याच्या मोहिमेला सीमाभागातील मराठी भाषिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 11 हजार पत्रे पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. सीमाभागातील मराठी जनतेने पत्र लिहून ही मोहीम यशस्वी करावी यासाठी गावोगावी जागृती सभा घेण्यात येत आहे
www.konkantoday.com