
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट वाहतुकीस खुला करण्याची तयारी पूर्ण
ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे गेले अनेक दिवस बंद असलेला रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट वाहतुकीस खुला करण्याची तयारी आणि नियोजनही झाले आहे.. रस्ता खचल्याने आणि दरड पडल्याने या आंबा घाटातील वाहतूक २२ जूनपासून बंद ठेवण्यात आली होती. आंबाघाटात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळली होती. दख्खन येथे कोसळलेली दरड फारच मोठ्या प्रमाणात होती. त्याचबरोबर या कोसळलेल्या दरडीमुळे या ठिकाणी रस्ताही नादुरुस्त झाला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून विषय दुरुस्तीचे काम गेले काही दिवस सुरू होते हा महामार्ग सायंकाळी किंवा उद्या सकाळपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे असे असले तरी या मार्गावरुन सध्या लहान वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे या महामार्गावरून मोठी वाहने जाऊ नये म्हणून लोखंडी कमानी उभारण्यात आल्या आहेत
www.konkantoday.com