पोसरे : मृतकांच्या वारसांना दिलेल्या धनादेशाबाबत खुलासा

रत्नागिरी – सोशल मिडीयाव्दारे मौजे पोसरे,ता.खेड येथील 4 मयताच्या वारसांना दिलेले मदतीचे धनादेश परत घेतले गेले. याबाबत सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या बातम्या आल्या आहेत. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे खुलासा खेडचे प्रांताधिकारी श्री अविनाश सोनोने यांचा खुलासा मागविण्यात आला असता, त्यांनी पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केलेले आहे.

        मौजे पोसरे,ता.खेड येथील दुर्घटनेमधील मयतांपैकी 4 मयताच्या वारसांना मदतीचे चेक मा.पालकमंत्री महोदय यांचे हस्ते प्रदान करण्यात आले होते. तथापि दुर्घटनाग्रस्त लोकांचे घरच गाडले गेल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा त्याबाबतचा तपशील वारसांकडे उपलब्ध नसल्यामुळे व संबंधीत बँक 30 km अंतरावर चिपळूण येथे असल्यामुळे मयतांचे नातेवाईक आणि श्यामकुमार गणपत मोहीते, अध्यक्ष, बौध्द समाज यांनी विनंती केल्यामुळे बँकेत जाऊन तलाठी यांचेमार्फत मयतांचे वारस यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ताब्यात घेतले होते. तसेच इतर 16 लाभार्थ्याचे Union bank मधील बँक अकाउंट शोधून त्यांना रु.62 लक्षचे चेक देण्यात येऊन बँकेत जमा करण्यात आले आहेत.

        खेड तालुक्यातील 17 पैकी 16 मयतांच्या वारसांना चेक प्रदान करण्यात आलेले आहेत. 1 मयताचा वारस तपासा अभावी अनुदान वाटप प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थीना त्यांच्या विनंतीनुसार मदत करण्याच्या व त्यांची बँक अकाऊंट शोधून त्यांच्याच अकाऊंटमध्ये मदत जमा होण्याच्यादृष्टीने संबंधित तलाठीमार्फत चेक परत घेऊन तलाठीमार्फत बॅकेत जमा करण्याच्या सद्उद्येशाने चेक परत घेण्यात आले होते, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button